Breaking News

महावीर जयंती निमित्त विविध कार्यक्रम

लातूर, दि. 08 - जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर जयंती यांच्या 2616 व्या निमित्त रविवार,दि.9 एप्रिल 17 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन  सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही सकाळी साडेसहा वाजता दिगंबर जैन मंदिर,लाड गल्ली येथून प्रभातफेरी निघणार आहे,ही फेरी पटेल चोैक, खडक हनुमान जीवराज  भवन,सेंट्रल हनुमान,दयाराम रोड,सुभाष चौक, गंजगोलाई,हनुमान चौक असे मार्गक्रमण करत चंद्रनगर येथील वर्धमान उद्यानात विसर्जीत होईल,यावेळी पंचरंगी  ध्वजाचे ह.भ.प.गहिणीनाथ महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल,कार्यक्रमाचे अध्यक्षपदी औसेकर महाराज हे भूषविणार आहेत.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जैन धर्माचे गाढे अभ्यासक अमरचंद गुगलिया यवतमाळ हे भ.महाविरांचे सिध्दांत मार्गदर्शन करणार आहेत.यावैळी उल्लेखनीय कार्य  करणार्‍या समाजबांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते या दुपारी 4 ते 6 या वेळात भालचंद्र रक्तपेढीमध्ये रक्तदाते अनिल डुगरवाल यांच्या  नेतृत्वात रक्तदानर शिबीर होणार आहे. तरी वरील सर्व कार्यक्रमात समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन  जयंती महोत्सव  समितीचे स्वागताध्यक्ष कमलकांत सेठ, तेजमल बोरा, राजीव बुबणे, महसमुखभाई शहार, विष्णुदास पोकरणा, सुरेश जैन, प्रसिध्दी प्रमुख राजेश डुंगरवाल यांनी  केले आहे,