Breaking News

पुरणमल लाहोटी शासकीय तंञनिकेतनमध्ये मेगा कॅम्प्स

200 विद्यार्थ्यांची झाली नौकरीसाठी निवड

लातूर, दि. 08 - येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंञनिकेतन लातूरमध्ये सोमवारी मेगा कॅम्प्स घेण्यात आला. यावेळी बजाज अ‍ॅटो लिमिटेड वाळूज,  औरंगाबाद या कंपनीच्या अधिकार्‍यांनी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेवून ऑनलाईन परिक्षा घेतल्या तसेच गेल्या 3 महिन्यात मेगा कॅम्पमध्ये चेन्नई येथील  थॉट वर्क्स, धुत ट्रान्समिशन प्रा.लि., एल अ‍ॅण्ड टी, टाटा मोटर्स, जनरल इलेक्ट्रीक कंपनीने शासकीय तंञनिकेतन कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेवून  नौकरीसाठी निवड केली आहे. 200 विद्यार्थ्यांची नौकरीसाठी निवड झाली असून त्यामध्ये पुरणमल लाहोटी शासकीय तंञनिकेतनच्या विद्यार्थ्यांची अधिक संख्या  आहे अशी माहिती या कॉलेजचे संगणक विभागाचे प्रमुख प्रा. एस. डी. राठोड यांनी दिली. 
पुरणमल लाहोटी शासकीय तंञनिकेतन, लातूरचे प्राचार्य बी. के. कुंभार ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर व संगणक विभागाचे विभाग प्रमुख एस.डी. राठोड, डी.एच.  कुलकर्णी, प्रा. चिलमे, एस. डी. जाधव यांच्यासह इतर प्राध्यापक कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांना नौकरीत संधी मिळावी म्हणून मेगा कॅम्प्ससाठी संबंधित कंपन्यांकडे  पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे गेल्या 3 महिन्यात 200 विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांनी नौकरीसाठी निवड केली आहे. त्यामध्ये संगणक, माहिती व तंञज्ञान,  इलेक्ट्रॉनिकस, मेकानिकल या शाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
चेन्नईच्या थॉट वर्क्स कंपनीने जानेवारी 2017 मध्ये लातूर जिल्ह्यातील डिप्लोमा धारक 177 विद्यार्थ्यांची पुरणमल लाहोटी शासकीय तंञनिकेतनमध्ये  नौकरीसाठी ऑनलाईन परिक्षा घेण्यात आल्या. त्यापैकी पुरणमलचेच 22 विद्यार्थी नौकरीसाठी निवडण्यात आले, धूत ट्रान्समिशन प्रा.लि. कंपनीने फेब्रुवारी 2017  मध्ये 348 विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा घेतली 348 पैकी 257 विद्यार्थ्यांची नौकरीसाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये 120 विद्यार्थी हे पुरणमल लाहोटी  तंञनिकेतनचे आहेत. बाकी शासकीय व खाजगी पॉलीटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थी आहेत. एल अ‍ॅण्ड टी कंपनीने 22 मार्च रोजी लातूर. नांदेड, जिंतूर,  उस्मानाबाद, सोलापूर येथील शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा घेतली त्यामध्ये 154 विद्यार्थी परिक्षेस बसले होते व 30 विद्यार्थी पाञ  ठरले.
लातूर, उस्मानाबाद, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची 27 मार्च दरम्यान ऑनलाईन परिक्षा झाली. 62 पैकी 32 विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. बजाज  अ‍ॅटो लिमिटेडने डिप्लोमा ट्रेनी इंजिनिअर्सच्या मुलाखती घेतल्या या वेळी बजाज कंपनीचे अधिकारी विक्रम साळुंके विजय शर्मा, आस्लम शेख, मनोज केळकर  यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या व सर्वांचे स्वागत पुरणमल लाहोटी शासकीय तंञनिकेतनचे कॉम्प्युटर विभागाचे प्रमुख एस. डी.राठोड यांनी स्वागत केले.  पुरणमल लाहोटी कॉलेजचा दर्जा उत्तम असल्याने व विद्यार्थ्यांच्या सुविधेकडे लक्ष असल्याने मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात हे कॉलेज अव्वल ठरत आहे.