Breaking News

लातुरचा बाजार होणार सुरु , हमालप्रश्‍नी नेमली समिती

लातूर, दि. 08 - लातूर बाजार समितीचे व्यवहार उद्या शुक्रवारपासून नियमितपणे सुरु होती. हमालांच्या प्रश्‍नांवर 10 सदस्यांची समिती नेमण्याचे ठरले असून  या समितीत व्यापार्यांचे पाच आणि हमालांचे पाच सदस्य असतील. हे सदस्य दोन्ही गटांनी निवडायचे आहेत. ही समिती 30 तारखेपर्यंत आपला  प्रस्ताव-शिफारस तयार करेल. त्यानंतर होणार्या बैठकीत तो मांडला जाईल. सर्वसंमतीने तो स्विकारला जाईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव मधुकर  गुंजकर यांनी दिली. 
बाजार समितीच्या आडत बाजारात काम करणार्या हमालांच्या कामांचे दर वाढवावेत या मागणीसाठी हमालांनी संप पुकारला आहे. सहय्यक कामगार आयुक्तांच्या  उपस्थितीत बैठक होऊनही तोडगा न निघाल्याने आजवर सौदा निघू शकला नाही. व्यापारी आणि हमालांच्या भांडणात शेतकरी मात्र भरडला गेला. हमालीची  दरवाढ होईल पण हमालांनी अडवणूक करु नये याची हमी व्यापार्यांना हवी आहे. आज लातुरच्या या बाजारात लाखो क्विंटल शेतमाल विक्रीसाठी पडून आहे.  तिकडे व्यापारी अडून होते, इकडे हमाल आपल्या भूमिकेवर ठाम होते, शेतकरी मात्र दोघांकडे हताशपणे पहात होते.