Breaking News

पंजाबी सेवा समितीच्या वधू -वर मेळाव्यास प्रतिसाद

अहमदनगर, दि. 15 - पंजाबीसेवा समितीच्या वतीने पंजाबी शीख समाजातील विवाहेच्छुकांचा मेळावा हॉटेल संजोग येथे झाला. या मेळाव्याला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. 220 हून अधिक युवक-युवतींनी मेळाव्यात नोंदणी केली. या मेळाव्याचे उद्घाटन राजकीय पुढार्‍याला बोलावता समाजातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष अजय पंजाबी, उपाध्यक्ष हितेश ओबेरॉय, सुनील सहानी, सुनील आनंद, चेतन जग्गी, बबला दुग्गल, पिंकी माकर, चरण तलवार, डॉ. सुरेंद्र खन्ना, प्रमोद चढ्ढा, विनोद दिवाण, राजू बस्सी, पियुष जग्गी, किशोर कंत्रोड, अमरिश सहानी, समर्पण ग्रूपच्या रुपा पंजाबी, सेवाप्रित संस्थेच्या जागृती ओबेरॉय, अंकिता जग्गी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जागृती ओबेरॉय यांनी केले, तर आभार हितेश ओबेरॉय यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीयूष जग्गी यांनी केले.