Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश


अहमदनगर, दि. 15 - डॉ.बाबासाहेबांच्या कार्यामुळे समता, मानवता व न्यायव्यवस्था टिकून आहे. डॉ.बाबासाहेबांचे विचार सर्वांसाठी प्रेरक असून, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.
रेल्वेस्टेशन परिसर येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा केडगाव मंडळ, नेहरु युवा केंद्र, समग्र परिवर्तन बहुसंस्था व जय युवा अ‍ॅकॅडमी आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त कार्यक्रमात अ‍ॅड.आगरकर बोलत होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पर्यावरण रक्षणाचा संदेश देत एक कार्यकर्ता एक झाड, या उपक्रमांतर्गत 51 रोपांचे वाटप करण्यात आले. युवकांनी या उपक्रमात उत्सफुर्तपणे सहभाग घेतला. यावेळी मा.नगरसेवक शिवाजी लोंढे, अशोक गायकवाड, वसंत लोढा, बाळासाहेब गायकवाड, नाना पाटोळे, अ‍ॅड.भानुदास होले, अ‍ॅड.महेश शिंदे, पै.नाना डोंगरे, नयना बनकर, पोपट बनकर, धीरज ससाणे, डॉ.भगवान चौरे, रोहीदास गाढवे, मयूर काळे, दिनेश शिंदे, मुकुल गंधे, साहेबराव विधाते, रावसाहेब मगर, मुख्य संयोजक बाळासाहेब पाटोळे, उत्सव समिती अध्यक्ष राम सकट, संदेश खारीया आदि उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन करण्यात आले. प्रा.जोगदंड यांनी बुध्दवंदना सादर केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाळासाहेब पाटोळे यांनी मतदार जागृती, कॅशलेस, जनधन, विमा आदि शासकिय योजना प्रत्येक नागरिकांपर्यंन्त पोहचविण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीने उपक्रम घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देवून, राबविण्यात येणार्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
वसंत लोढा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण अंगी कारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे शाम साळवे, सचिन चोरडिया, विनोद दुशिंग, नितीन जगताप, गणेश भालेराव,  दादा गायकवाड, शब्बीर शेख, संदेश खारीया, पप्पू शिंदे, सागर कोळी, अमर निरभवने, उदय अनभुले, अक्षय मगर, अण्णासाहेब पाटोळे, अनिल ओहोळ आदिंनी परिश्रम घेतले.