Breaking News

तोंडी तलाक पद्धतीसंदर्भातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली, दि. 21 -मुस्लीम पुरुषाशी विवाह केलेल्यामहिलांना तोंडी तलाक पद्धत लागू होण्याला स्थगिती देण्याबाबतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 
हिंदू महिलांनी मुस्लीम पुरुषाशी विवाह केल्यानंतर या महिलांना तोंडी तलाक पद्धत आणि बहुपत्नीकत्व नियम लागू करू नयेत, असे निर्देश केंद्र सरकारला देण्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच विशेष विवाह अधिनियमांतर्गत आंतरजातीय विवाहांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात यावेत, अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली. आज या याचिकेवरील सुनावणीवेळी ही याचिका फेटाळण्यात आली. देशातील कायद्याप्रमाणे सर्व महिलांना समान हक्क आणि अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.