Breaking News

राजस्थानमध्ये 13 वर्षीय मुलीचा पुरुषाबरोबर विवाह लावण्याचा प्रयत्न

भरतपूर, दि. 21 - राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी पालकांनी केलेली मागणीचा पंचायतीकडून फेटाळण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांवर जबरदस्ती लादण्यात येणारी विवाह पद्धत बंद केली जावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणी मान्य करण्यास पंचायतीने नकार दिला आहे.
राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील एका गावातील ग्राम पंचायतीतील नेत्यावर 13 वर्षीय मुलीला 45 वर्षीय पुरुषाशी लग्न करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कैलाश गुर्जर या स्थानिक रहिवाशाकडून या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लैलागाचे रहिवासी कैलाश गुर्जर यांनी जिल्हाधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार ग्रामपंचायतीने धमकी दिली असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीचे 45 वर्षांच्या पुरुषाशी लग्न करून द्यावे लागले, अशी धमकी त्यांना पंचायतीकडून देण्यात आली होती. त्यांनी आपल्या कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.