Breaking News

अभिनेता भरत जाधव यांना पितृशोक

कोल्हापूर, दि. 22 - मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता भरत जाधव यांना पितृशोक झाला आहे. भरत जाधव यांचे वडील गणपत हरीभाऊ जाधव यांचं शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने कोल्हापुरात निधन झालं.
गणपत जाधव हे पत्नी शांता आणि पुतण्यासह कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत राहत होते. राहत्या घरी शुक्रवारी संध्या 6.45 सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 88 वर्षांचे होते. गणपत जाधव यांच्यावर आज (शनिवार) अंत्यसंस्कार होणार आहेत.