Breaking News

डॉ.आंबेडकरांनी विचाराने रक्तहिन क्रांती केलीःपी.जी.सूर्यवंशी

लातूर (प्रतिनिधी), दि. 23 - जगाच्या पाठीवर अनेक देशात राजकीय,धार्मिक सत्तेसाठी करोडेंचे बळी द्यावे लागले,तथापि आधुनिक काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांमध्ये विचारांची पेरणी करुन रक्तहिन धार्मिक ,सामाजिक क्रांती घडवून आणली,असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते पी.जी.सूर्यवंशी यांनी केले.
हरिभाऊ नगरातील सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालयात 14 एप्रिल 17 रोजी आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत हेाते.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सचिव बी.जी.होळीकर हे होते.
प्रारंभी उपस्थितांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमितेला पुष्पहार अर्पण करुन सामूहिक अभिवादन केले.त्यानंतर पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या रुपाने भारत देशाला एक नवा ज्ञानरुपी नेता लाभला, त्याच्या कार्य आणि विचारांचा आज भारतात नव्हे तर युनोध्ये जयंतीनिमित्ताने जयजयकार होतो आहे. चांगल्यांचा जयजयकार आणि वाईटाचा धिक्कार होतो,यातले पहिले  स्विकारणे हेच मानव जातीसाठी योग्य असल्याचे सांगून पी.जी.सूर्यवंशी यांनी आज शंभर वर्षानंतरही आंबेडकर युगाची छाया देशावर आहे,त्यांच्या विचारानेच देशाची महासत्तेकडे वाटचाल होवू शकेल असा विश्‍वास व्यक्त केला.होळीकर यांनी अध्यक्षीय समारोप आणि आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल अंजुषा काटे यांनी केले.कोषाध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला ऍड.अमोल मुरकुटे, राजू रेड्डी महाराज, संकेत होळीकर, राजेंद्र परसबोने, अजित सूर्यवंशी, इरफान मुल्ला,माजी मुख्याध्यापक आर.एन.खाडप,भास्कर भालेराव यांच्यासह अनेक वाचक उपस्थित होते.