रस्ता दुरूस्तीची नागरीकांची मागणी
बुलडाणा, दि. 30 - स्थानिक मिर्झा नगर मधील रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असून या रस्त्याचे क्रॉक्रेटीकरण करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, मिर्झा नगर मध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहे. यामध्ये साचलेल्या सांडपाण्यामुळे परीसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मुस्लीम बांधवांना नमाजासाठी व मुलांना शाळेमध्ये जाण्याकरीता फार त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे खडीकरण व क्राँक्रेटीकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे विदर्भ प्रमुख राणा चंदन, शे.रफीक शे.करीम, तुषार काचकुरे, साजीद, मुजिब, मिश्किनशाह, सै.जयरूद्दीन, अजगरशहा, शे. रशिद, शे.जावेद हुसेन, अमजदखान, सै.मोसिन, नवाब मिर्झा, अमिन, सत्तार, जफर आदि उपस्थित होते.