Breaking News

जिल्ह्यातील न्यायाधिशांच्या बदल्या

बुलडाणा, दि. 30 - महसूल, पोलीस प्रशासनाच्या बदल्यांच्या धामधूमीतच राज्यातील 242 न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील पाच न्यायाधीशांचा समावेश आहे. बुलडाणा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. कलोती यांची मुंबई येथील सीटी सिव्हिल न्यायालयात बदली करण्यात आली आहे. तसेच एस.डी. भगत यांची ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे बदली झाली आहे. एस.सी. सिरसाट यांची औरंगाबाद येथे व पी.एल. गजभिये यांची धुळे येथे बदली झाली आहे. खामगावचे डी.एन. सुरवशे यांची बीड येथे बदली करण्यात आली आहे. या पाचही न्यायाधीशांच्या जागी बाहेर जिल्ह्यातून न्यायधीश येणार आहेत. ठाणे येथील आर.एम. कुळकर्णी, पालघर (ठाणे) येथील ए.डी. क्षीरसागर, बीडचे एस.एस. शर्मा व जयसिंगपूर (कोल्हापूर) चे एन.आर. तळेकर यांची बुलडाणा येथील जिल्हा न्यायालयात बदली झाली आहे. तसेच औरंगाबादचे एम.जी. चव्हाण हे खामगाव न्यायालयात रुजू होणार आहेत.