Breaking News

दिव्यांगांची मानसिकता जपणे गरजेची बाब : उपअभियंता मोरे

कराड, दि. 9 (प्रतिनिधी) : अपंगत्व म्हणजेच दिव्यांगता, वाटेला आलेले अपंगत्व सुसह्य कसं करायचं? अपंंगत्वावर तुम्हाला कोणावर ना कोणावर अवलंबून रहावं लागतं. जे आपल्या  अपंगत्वाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. समजाचा दिव्यांगाकडे पहाण्याचा दृष्टीकोन प्रथम बदलला गेला पाहीजे. त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र  त्यांना उपलब्ध करून दिले तर, ते आपली एकाग्रता एकवटून होत्याचे नव्हते करून दाखवितात. दिव्यांगाची मानसिकता जपणे फार महत्वाची बाब आहे असे प्रतिपादन,  जलसंपदा विभाग साताराचे उप-अभियंता ए. एन. मोरे यांनी केले. 
येथील डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्युटस् डॉ.दौलतराव आहेर अभियांत्रिकीच्या, बेसिक सायन्स  अ‍ॅण्ड  ह्युमॅनिटीज्  विभागाच्यावतीने आयोजित ’दिव्यांगासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा होणारा उपयोग’ या संकल्पनेवर आधारित,’राष्ट्रीय विज्ञान दिना’च्या उध्द्ाटन समारंभाप्रसंगी विशेष अतिथीपदावरून मोरे बोलत होते. यावेळी समारंभाचे प्रमुख अतिथी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडचे प्राध्यापक  डॉ. पी. एम. जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जालींदर पाटील, उपप्राचार्य प्रा. हणमंत कुंभार, विभागप्रमुख प्रा. शिवाजीराव लोकरे, समन्वयक प्रा. पल्लवी सावंत, सह-समन्वयक डॉ. सौ. संजीवनी क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजाच्या  प्रगतीचे  मापन  हे अभियांत्रिकीच्या विकासावरून  मानले  जाते. असे कोणते  तंत्रज्ञान  आहे  जे  आपल्या  समाजातील सर्व  घटकांना  एकत्र  बांधून  घेऊन  जाईल.  संस्कृतीचे  संवर्धन  होताना  काळाच्या पातळीवर ज्या कांही रूढी परंपरा आहेत त्या टाकून दिल्या पाहीजेत. विज्ञान हे या़मधील महत्वाचे घटक असल्याचे सांगून, बायो-टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचे टेक्निकल, विज्ञानामध्ये पराक्रम करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे डॉ. पी. एम. जोशी यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. जालींदर पाटील यांनी विज्ञान दिनाचे महत्व सांगून, विज्ञान दिनास शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाने विज्ञानदिनाच्या संकल्पनेवर  भर  देत, यावर्षी  प्रथमच  डॉ. डी. एस. एरम मूकबधीर विद्यालय व संजीवनी इन्स्टिट्युटस् अपंग मुलांची शाळा नं 2 मधील विद्यार्थ्यांना सहभागी करीत, त्यांच्यासाठी चित्रकला, हस्तकला स्पर्धा तसेच, इतर विविध शाळांमधील विद्याथ्यार्ंंकरीता प्रकल्प सादरीकरण व पॉवर पॉईंट आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित केल्याचे विभागप्रमुख प्रा. शिवाजी लोकरे यांनी सांगितले.
प्रारंभी प्राचार्य डॉ. जालींदर पाटील, उपप्राचार्य प्रा. हणमंत कुंभार, विभागप्रमुख प्रा. शिवाजीराव लोकरे, समन्वयक प्रा. पल्लवी सावंत यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. पल्लवी सावंत यांनी केले. आभार डॉ. सौ. संजीवनी क्षिरसागर यांनी मानले. प्रा. सौ. शितल पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुत्रसंचालन अंकीता जगताप व सायली देशमाने या विद्यार्थिनींनी केले.