अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी येरळवाडी धरणाकडे जाणारा रस्ता बंद
वडूज, दि. 9 (प्रतिनिधी) : खटाव तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी वरदान ठरलेले येरळवाडी धरण सुरक्षा भिंतीलगतच्या बेसुमार वाळू उपशामुळे येरळवाडी धरण धोक्याच्या मार्गावर आले आहे. याबाबत तहसीलदारांनी कडक पावले उचलत याठिकाणी येणारा रस्ता ग्रामस्थांच्या सहकार्याने बंद करून टाकला.
खटावच्या तहसीलदार सीमा होळकर यांनी कडक पवित्रा घेत पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांना घेऊन येरळवाडी धरणाची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने धरणाकडे येणारा मुख्य रस्ता बंद करून टाकला. यावेळी तहसीलदार होळकर यांनी कडक भूमिका घेत पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना तातडीने तक्रार द्या, अन्यथा मी तसा तुमचा अहवाल वारिष्ठांकडे सादर करते, अशी तंबी दिली होती.
धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास सुरक्षा भिंती कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. धरणाच्या शेजारी येरळवाडी,नढवळ, बनपुरी, पिंपळवाडी, अंबवडे, गुरसाळे ही गावे आहेत. सुरक्षा भिंती मातीच्या बनविलेल्या आहेत. भिंतीलगत मोठ्या प्रमाणातून वाळू माफियांनी खोल खड्डे खोदले आहेत. त्यामुळे सुरक्षा भिंती फुटून जाण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी वाळूसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये अंबवडे येथील दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता.