कराडनजीक 15 लाखांचे सिसम लाकूड जप्त
कराड, दि. 9 (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील चचेगाव गावाच्या हद्दीत 15 लाखाहून अधिक किंमतीचे सिसम लाकडाचे तब्बल 154 तुकडे कराड तालुका पोलिसांनी जप्त केले आहेत. हे सर्व तुकडे पोलिसांनी वनविभागाच्या ताब्यात दिले. ह्या कारवाईनंतर पोलीस अन्सार बाबासो मुल्ला यांचा शोध घेत आहेत.
कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांना मिळालेल्या माहितीवरून सपोनि विवेक पाटील, हणमंत गायकवाड या अधिकार्यांसह आबा जगदाळे, उपविभागीय कार्यालयातील सहकार्यांनी शुक्रवारी रात्री चचेगाव गावाच्या हद्दीत 15 लाखाहून अधिक किंमतीचे सिसम लाकडाचे तब्बल 154 तुकडे अन्सार मुल्ला याच्या शेतात जप्त केले. या घटनेनंतर अन्सार मुल्ला हे पसार झाले आहेत. मुल्ला यांच्या गट नंबर 32 मधील शेतीच्या बांधावर हळदीच्या पानाखाली सिसम लपवून ठेवण्यात आले होते. हे सिसम कोठून आणि कोणाच्या मध्यस्थीने आणले होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याचबरोबर तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत असण्याचीही शक्यता आहे.