मिसबाह पाठोपाठ युनीस खानचाही क्रिकेटला अलविदा!
कराची, दि. 08 - पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक पाठोपाठ आता हुकमी फलंदाज आणि माजी कर्णधार युनीस खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर युनीस खान आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा करणार आहे. सध्या निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रत्येक खेळाडूला हा निर्णय घ्यावाच लागतो, असं युनीस खान म्हणाला. युनीस खानने वन डे, कसोटी आणि टी ट्वेण्टी अशा क्रिकेटच्या सर्व प्रकारात पाकिस्तानचं नेतृत्त्व केलं आहे. इतकंच नाही तर युनीस खानच्याच नेतृत्त्वात पाकिस्तानने 2009 मध्ये टी ट्वेण्टी विश्वचषकही जिंकला.
युनीस खानने 115 कसोटी सामन्यात 9977 धावा ठोकल्या आहेत. दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला अवघ्या 23 धावांची गरज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत तो हा टप्पा गाठेल अशी अपेक्षा चाहत्यांची आहे. युनीस खानने कसोटीमध्ये 34 शतकं तर 32 अर्धशतकं ठोकली आहेत.