Breaking News

अस्वलांच्या प्रजनन कालावधीत सावधगिरी बाळगावी!

मोहफुले गोळा करताना सावधनता ठेवा - वन विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 15 - जिल्ह्याच्या मधोमध सुमारे 203.21 चौ.कि.मी. इतके क्षेत्र ज्ञानगंगा  अभयारण्या अंतर्गत  येते. अभयारण्याचे पश्‍चिम, उत्तर व पूर्व दिशेत सभोवतालचे क्षेत्र सुध्दा  वनक्षेत्राखाली येते. सदर अभयारण्य हे अस्वल या वन्यप्राण्याचा   नैसर्गीक अधिवास आहे. अस्वलाचा प्रजनन कालावधी हा एप्रील ते जुन पर्यंत असतो. एक मादी अस्वलीच्या मागे 3 ते 4 नर अस्वल असतात. ह्या प्रजनन काळात अस्वल उत्तेजित व आक्रमक असतात. त्यामुळे या काळात अस्वलांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले असते.  या हल्ल्यांमध्ये मानवी मृत्यूही होतात. तरी नागरिकांनी  अस्वलांच्या या प्रजनन काळात सावधगिरी बाळगावी, अस्वल असलेल्या क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करावा, असे आवाहन उपवनसंरक्षक बी.टी भगत यांनी केले आहे.
अशा प्रकारे बाळगा सावधगिरी : मनुष्य वस्तीच्या  आसपासच्या  भागातील  किंवा गावाकडे  जाण्या - येण्यासाठी  वापरल्या  जाणार्‍या  रस्त्यावरुन  वेगाने  वाढणार्‍या  प्रजाती  बाभुळ, रायामोनिया, घाणेरी आदी  झुडुपे  साफ करावी. स्थानिक लोकांनी  विशेषत: हॉटेल्स, खानावळी, लग्न मंडपे, वसतीगृहे, बाजाराचे स्थळ आदी  ठिकाणी  हॉटेल्स व्यावसायिकांनी काळजी घ्यावी. अस्वलाचे  आश्रयस्थान असलेल्या  ठिकाणी मानवांनी  प्रवेश  करु नये व गावात  जागरुकता  बाळगावी. अस्वलाचे  अधिवास क्षेत्रातील फळझाडे  तोडण्यात येवु नये. अस्वलाच्या सवयी आणि  वागणुक  याबद्दल  स्थानिक  रहिवाशांमध्ये  जागरुकता  निर्माण  केली जावी. सध्या  मोहफुलाचा हंगाम असुन  ते अस्वलाचे आवडते  खाद्य आहे. त्यामुळे  सकाळी व संध्याकाळी  मोहफुले  गोळा  करतांना  विशेष  काळजी घ्यावी. अस्वलाचा वावर असलेल्या  भागात   लोकांनी  एकटे दुकटे न फिरता गटा गटात फिरावे. अशा वेळी  वावरतांना हातात काठी  बाळगणे  आवश्यक आहे. वयोवृध्द  व्यक्ती  व लहान  मुलावर विशेष  लक्ष द्यावे. अस्वल अचानक  दिसल्यास  उपस्थीत  सर्वांनी  एकत्र यावे .अस्वलाने दखल न घेतल्यास  आपण सुरक्षीत  अंतरावर  जावुन  व त्याला  निघुन जाण्यास  मार्ग मोकळा करावा. अस्वलाने  अंगावर धाव घेतल्यास  जोरात हातवारे करुन  व काठया  फिरवुन  आवाज करावा. जेणे करुन  अस्वलास आकाराने  मोठे व जास्त आवाज करणारे  काही  असल्यास  भास होऊन ते निघुन जाईल.
अभयारण्य व वनक्षेत्रात   प्रवेश करु नये. अस्वल दिसल्यास  वनअधिकारी  किंवा  वन  विभागाचे नियंत्रण कक्ष 07262-242334 या क्रमांकावर कळवावे. तसेच डोंगरखंडाळा येथील वनविभागाच्या कॅम्पवर माहिती द्यावी. त्याकरीता संपर्क अधिकारी यांची नावे व दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादे) -7030255444, वनपाल, डोंगरखंडाळा -7066212723, वनपाल उंद्री-9689427698, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादे)- मोताळा-9421856885, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादे) खामगाव-9689265445, सहा. वनसंरक्षक (प्रादे व कॅम्प) 9421329796, असे  उपवनसंरक्षक ,बुलडाणा वनविभागाच्या वतीने  कळविण्यात आले आहे.