Breaking News

अंबिका अर्बन लुटण्याचा प्रयत्न

सीसीटीव्ही निकामी करताना लागली आग ; 15 लाखाचे नुकसान 

बुलडाणा, दि. 15 - येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये असलेया अंबिका अर्बन मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडिट सोसायटीच्या बुलडाणा शाखेत काळ रात्रीदरम्यान धाडसी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चोरटयांनी बँकेच्या शटरची कुलपे तोडून आत प्रवेश केला, सीसीटीव्ही कॅमेरे निकामी करण्याच्या प्रयत्नात शाखेला आग लागल्याने चोरीचा प्रयत्न फसला. मात्र शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण शाखा जाळून खाक झाली आहे. चोरटयांनी अंबिका अर्बनच्या वर असलेया पीएस केबल शॉपीचेही कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला परंतु या दुकानात चोरीसारखे काहीच नसल्याने चोरटे खाली हात परतले. 
याबाबत सविस्तर माहीत अशी कि, यथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये अंबिका अर्बन मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडिट सोसायटी ली. चिखली ची बुलडाणा शाखा आहे. काल रात्री अंदाजे 1 वाजेनंतर अज्ञात चोरटयांनी या शाखेत चोरीचा पर्यटन केला. शटरची कुलपे तोडून चोरटयांनी बँकेत प्रवेश केला. आतमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे निकामी करण्यासाठी चोरटयांनी विजेचे वायर तोडण्याचा प्रयत्न केला यामुळे शाखेत शॉट सर्किट होऊन आग लागली आणि वीजपुरवठा खंडीत झाला. त्यानंतर चोरटयांनी बँकेची तिजोरी तोडण्याचा प्रयत्न केला असावा मात्र आग धूर आणि अंधारामुळे त्याना यात यश आले नसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिजोरी फोडण्यासाठी चोरटयांनी कटर आणि  इतर साहित्याचा वापर केल्याच्या खुणा तिजोरीजवळ मिळून आल्या मात्र तिजोरी न उघडल्याने तिजोरीत असलेली सहा ते सात लाखाची रोख आणि सोने सुरक्षित राहिले. परंतु आगीमुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. बँकेतील संगणक, एसि, उच्च दर्जाचे फर्निचर, टेबल खुर्च्या, स्टेशनरी, कागदपत्रे, लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरे जाळून खाक झाले असून तब्बल 15 लाख 71 हजाराचे नुकसान झाले आहे. सकाळी आठ वाजता बँकेचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर खरात यांना मोबाईलवरून घटनेची माहिती मिळाली, त्यांनी त्वरित शाखाकडे धाव घेत शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली. तात्काळ शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हिवाळे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून त्वरित तपासाची सूत्रे हलविण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक श्‍वेता  खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी यांनीही घटनास्थळावर येऊन पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या. बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाल्याने फिंगर प्रिंट एक्स्पर्ट व श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. परंतु आगीत सर्व साहित्य जाळून खाक झाल्याने व धुराचा वास असल्याने श्‍वान पथकाला चोरट्याचा माग काढता आला नाही. अंबिका अर्बनला दोन शटर चे प्रवेशद्वार आहे. चोरटयांनी बरोबर ज्याठिकाणी दरवाजा आहे त्याच शटरची कुलपे तोडून शाखेत प्रवेश केला. त्यामुळे या चोरीचे आधीच नियोजन करण्यात आले असावे असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणी अंबिका अर्बनचे बुलडाणा शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर खरात यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 457,380,511,427 नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार हिवाळे यांच्या मार्गदर्शनात एपीआय हरीश ठाकूर करत आहे.