तामिळनाडूमधील शेतकर्यांचे आंदोलन तुर्तास मागे
नवी दिल्ली, दि. 24 - गेले 39 दिवस जंतर-मंतर येथे सुरू असलेले तामिळनाडूमधील शेतकर्यांचे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी शेतक-यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने 25 मेपर्यंत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून ते पूर्ण न केल्यास 25 मेपासून पुन्हा आंदोलनाला सुरूवात करू असे शेतकर्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी जंतर-मंतर येथे जाऊन आज आंदोलनकर्त्या शेतकर्यांची भेट घेतली. तुमच्या मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी शेतकर्यांना दिली, त्यामुळे शेतकर्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. 40,000 कोटी रुपयांचा दुष्काळ निवारण निधी व कर्ज माफी मिळावी तसेच कावेरी जल व्यवस्थापन मंडळ स्थापना आदी मागण्यांसाठी हे शेतकरी आंदोलन करत आहेत.