स्व.रा.गो. टाकळकर गुरुजी संगीत समारोहात रमाकांत गायकवाड यांची मैफल संपन्न
बुलडाणा, दि. 30 - बुलडाण्यातील गुरुवर्य स्व. रा.गो. टाकळकर गुरुजी यांच्या सहाव्या स्मृतीदिना निमीत्त व गर्दे वाचनालयाच्या शताब्दी वर्षाच्या निमीत्ताने स्वरसाधना संगीत विद्यालय बुलडाणा व गर्दे वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आजच्या काळातील आघाडीचे युवा शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीचे आयोजन गर्दे वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रारंभी स्व. टाकळकर गुरुजींच्या प्रतिमेचे पुजन करुन मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी गायक रमाकांत गायकवाड, गोकुल शर्मा, बाळासाहेब देशपांडे, आशुतोष वाईकर, उदय देशपांडे, वामनराव इटनारे, सुर्यकांत गायकवाड, संगीता गायकवाड, माया मोटेगावकर, अविनाश टाकळकर, शंतनु शुक्ल, कु गायत्री गायकवाड यांची संगीतपिठावर उपस्थिती होती.
गेल्या पाच वर्षापासुन सुरु करण्यात आलेला स्व. रा.गो. टाकळकर गुरुजी स्मृती संगीत सेवा पुरस्कार यंदा नादुरा येथील जेष्ठ शास्त्रीय भजन गायक वामनराव इटनारे यांना रमाकांत गायकवाड व अविनाश टाकळकर यांनी प्रदान केला. बुलडाणा शहर व परिसरातील संगीत क्षेत्रात नि:स्वार्थ सेवा करणा-या व्यक्तीला हा पुरस्कार रु 1000 रोख व शाल स्मृतीचिन्ह देवुन प्रदान करण्यात येतो. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर रमाकांत गायकवाड यांनी सांयकालीन मारवा रागातील बडाख्याल पिया नही आये ही विलंबीत एकतालातील बंदीश सादर केली आपल्या प्रभावी गायकीने रमाकांत गायकवाड यांनी मारवा रागाचे संपुर्ण भावविश्व निर्माण करुन रसिकांना तृप्त केले. एकंदरच त्यांच्या गायकीने बुलडाण्यातील रसिक भारावुन गेले. बागेश्री रागातील मध्यलयीतील कैसे कटे रजनी अब सजनी विलंवित एकतालातील बंदिश सादर करुन त्रितालातील रुमझुम बाजे पायलीया,कैसे जाउ पिया के मिलन ही छोटाख्यालाची बंदिश सादर केली.
कागा सब मत खैयो मास, न खैयो नयना...
मोहे पीय मिलनकी आस
या आर्त सुरांनी यामैफलीची सांगता भैरवी रागातील याद पिया की आये, ये दुख सहा न जाये ठुमरी गाउन करण्यात आली. रमाकांत गायकवाड यांच्या मैफलीला तबल्यावर शंतनु शुक्ल व संवादिनीवर कु गायत्री गायकवाड यांनी साजेशी सुंदर साथसंगत केली, तानपु-यावर सौ छाया गोखले यांनी साथ केली. रमाकांत गायकवाड यांनी बुलडाण्यातील जानकार व चोखंदळ रसिकांना दाद दिली बुलडाण्यातील रसिकांनी दिलेली दाद अविस्मरणिय असल्याचा त्यांनी आवर्जुन आपल्या बोलण्यात केलेला उल्लेख रसिंकाना भावला. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन चंद्रशेखर जोशी यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रविकिरण टाकळकर यांनी केले.
या संगीत मैफीलीच्या यशस्वीतेसाठी नेमीनाथ सातपुते, अनुप टाकळकर, निषाद टाकळकर, पियुष टाकळकर, धिरज उबरहंडे, अरविंद पवार अर्जुन सातपुते, किशोर शर्मा, जिवन शेगांवकर, श्रीकांत कुळकर्णी, सचिन बल्लाळ, अनिल पालकर यांचेसह स्वरसाधना संगीत विद्यालय व गर्दे वाचनालय परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेतला.