Breaking News

भारतीय वायूसेनेचा सैन्य भरती मेळावा

बुलडाणा, दि. 30 - भारतीय वायूसेने व्दारा दिनांक 6 मे ते 12 मे 2017 या कालावधीत महाराष्ट्र व गोवा राज्यामधील इच्छुक उमेदवाराकरीता तासगांव (जिल्हा - सांगली) येथे सैन्य भरती मेळावा आयोजित केला जात आहे. सदर मेळाव्यामध्ये भारतीय वायूसेना (सुरक्षा/ गरुड) व मेडीकल असिस्टंट या पदासाठी पुढीलप्रमाणे निवड केली जाणार आहे. तरी पात्रता पुर्ण करणा-या इच्छुक उमेदवारानी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा. अ)भारतीय वायूसेना (रक्षक/ गरुड) : भरतीची  दिनांक व वेळ 8 मे 2017 रोजी (पहाटे 5.30 ते 9.30 पर्यंत)  (उशीरा येणा-या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही). शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण आटर्स/कॉमर्स/ सायन्स शाखेतून किमान 50 टक्के गुणासह उत्तीर्ण व इंग्रजी विषयात किमान 50 टक्के गुण आवश्यक वयोमर्यादा  दि. 7 जुलै 1997  ते 20 डिसेंबर 2000 या दरमान्य जन्म असावा. (17 ते 21 वर्ष). शारिरीक पात्रता (उंची) 152.5 से.मी. शारिरीक क्षमता चाचणी  1.6  किमी  धावणे  (5 मिनटे 40  सेंकदमध्ये,   8 चिनअप्स, 20 पुशअप्स आणि 20 सिटअप्स. आवश्यक कागदपत्रे 10 वी पासचे मुळ सर्टिफिकेट,12वी पासचे मुळ सर्टिफिकेट व मार्कलिष्ट, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल). लेखी परिक्षा 50 गुणांचे 50 प्रश्‍न (इंग्रजी, बुध्दीमता चाचणी व सामान्य ज्ञान). अनुकूलन क्षमता चाचणी (अडॅप्टबिलिटि टेस्ट ) अनुकूलनक्षमता चाचणी  क्र.1 व 2 (अडॅप्टबिलिटि टेस्ट ). याप्रकारे राहणार आहे.
आ) भारतीय वायूसेना  (मेडीकल असिस्टंट): भरतीचा दिनांक व वेळ 10 मे 2017 (पहाटे 5.30 ते 9.30 पर्यंत) (उशीरा येणा-या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही ). शैक्षणिक पात्रता इयत्ता  12 वी  पास सायन्स शाखेतून किमान 50 टक्के गुणासह उत्तीर्ण व इंग्रजी विषयात किमान 50 टक्केगुण व जीवशास्त्र विषय गरजेचा आहे.  वयोमर्यादा दि. 7 जुलै 1997 ते 20  डिसेंबर 2000 या दरमान्य जन्म असावा. (17 ते 21 वर्ष). शारिरीक पात्रता (उंची) 152.5से.मी. आवश्यक कागदपत्रे 10 वी पासचे मुळ सर्टिफिकेट, 12वीपासचे मुळ  सर्टिफिकेट  व  मुळ  मार्कलिष्ट, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल). लेखी परिक्षा 50 मार्कसचे 50 प्रश्‍न (45 मिनिटामध्ये सोडविणे), शारिरीक क्षमताचाचणी 1.6 किमी धावणे (07 मिनटात पूर्ण करणे), 10 पुशअप्स, 10 सिटअप्सआणि 20 बैठका. अनुकूलनक्षमता चाचणी (अडॅप्टबिलिटि टेस्ट ) संयोगक्षमता चाचणी .
सैन्य भरती प्रक्रिया सर्वांसाठी मोफत असुन सर्वत-हेने पात्र असणा-या उमेदवारांची  गुणवत्तेनुसार  भरती   केली  जाते. त्यासाठी कोणत्याही एंजटची/ मध्यस्थीची मदत घेऊ नये किंवा त्याना पैसे देऊ नये व अशा फसवणुकी पासुन सावध रहावे. तसेच आपण जर एजंट/ मध्यस्थांच्या सानिध्यात असाल  तर  त्याची माहिती  त्वरीत  जवळच्या  पोलीस  स्टेशनला/ भरती अधिकार्‍याला किंवा टी करप्शन सेल (लाचलुचपत प्रतिबंध विभाग, सांगली) दुरध्वनी क्रमांक.  0233-2373095 /  8600897199 /  9421858570  यांना  द्यावी.   गैरवर्तणुक  करणाया  उमेदवारास  सैन्य भरतीतून अपात्र करुन त्याचे विरुध्द कायदेशीर कार्यवाही केली जाईल. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,  सांगली  दुरध्वनी क्र. (0233-2671711) येथे संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.