Breaking News

सिंगापूर ओपनमध्ये के. श्रीकांत विरुद्ध साई प्रणीत

सिंगापूर, दि. 16 - सिंगापूर ओपन बॅडमिंटन सुपर सीरिजच्या अंतिम फेरीत भारताचा किदाम्बी श्रीकांत आणि साई प्रणीत एकमेकांसमोर उभे ठाकलेत.  श्रीकांत आणि प्रणीत या दोघांनी एकमेकांच्या प्रतिस्पर्ध्यांना उपांत्य फेरीत हरवत अंतिममध्ये प्रवेश केला.
श्रीकांतने जागतिक क्रमवारीत 26व्या स्थानी असलेल्या अँथनी सिनिसुकाला 21-13, 21-14 असे हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे प्रणीतने तीनवेळा कोरिया मास्टर्स ग्राँड पिक्स गोल्ड विजेता लीचा 21-6, 21-8 असा पराभव करत अंतिम फेरीत मजल मारली.  त्यामुळे अंतिम फेरीत आता प्रणीत आणि श्रीकांत यांच्यात खरी चुरस रंगणार आहे.