गुजरात पोलीस चांगले, पण त्यांच्यावर मोदींचा दबाव : आमदार बच्चू कडू
गांधीनगर, दि. 22 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तालिबानी सरकारनं आम्हाला आंदोलनापासून रोखलं, गुजरातचे पोलीस चांगले, पण त्यांच्यावर मोदींचा दबाव आहे, अशा शब्दात प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी निशाणा साधला. दरम्यान बच्चू कडू यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आसूड यात्रे अंतर्गत सीएम टू पीएम यात्रेसाठी बच्चू कडू वडनगरकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली होती. शेतकर्यांना कर्जमाफी आणि हमी भाव द्यावा यासाठी बच्च कडू आणि रघुनाथदादा पाटील यांनी आसूड यात्रा काढली.