सामाजिक ऐक्य महत्वाकांक्षेच्या सुळावर चढविणारे दलाल कोण?
महाराष्ट्र पुरोगामी विचारसरणीचा आहे असे म्हटले जाते.एका अर्थाने ते खर आहे,या या महाराष्ट्राला शिवछञपतींच्या स्वराज्याचा वारसा आहे.स्वराज्याला म.फुले,राजश्री शाहु महाराज,डा.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांनी पुरोगामी विचारांची आमुल्य देण दिली आहे.हे महानुभव केवळ विचार देऊन थांबले नाहीत तर तत्कालीन समाजात प्रत्यक्ष रूजवली.त्याचे परिणामही दिसले.
समाजव्यवस्थेतील नाना जातपंथाचे लोक गावपातळीवर गुण्यागोंविदाने वावरत होते,एकमेकांच्या सुखदुःखात हिरिरीने सहभागी होत होते.एकुणच सामाजिक सलोखा खर्या आर्थाने विकसित झाला होता.
काळाच्या प्रवाहात परिस्थिती बदलत गेली.व्यक्ती परत्वे प्राधान्यक्रम बदलत गेला.अत्यावश्यक गरजेची परिभाषा बदलली.गरजा मोल्ड आणि त्यातून बोल्ड झाल्या.आणि याच प्रवाहात महत्वाकांक्षी पिलावळीने आपला प्रभाव दाखविण्यास सुरूवात केली.
राजकीय महत्वाकांक्षेने याच पुरोगामी विचारसरणीचे चिलखत वापरून सत्तेचा भोग घेण्यास सुरूवात केली.शिवाजी,फुले, शाहु,आंबेडकरांना सत्ता मिळवून देणार्या प्रक्रियाचे उत्प्रेरक म्हणून या मंडळींनी प्रारंभ केला.
समाजव्यवस्थेला इथेच खिंडार पाडणार्या षडयंञांचा पाया भरला गेला.अलिकडच्या काही वर्षात तर समाजव्यवस्थेला पोकळ करून जातीपातीच्या भींती उभ्या करण्यासाठी समाजात दलालांची पेरणी सुरू आहे,हे दलाल आपआपल्या समाजात अन्य समाजाविषयी विष पेरून मनभेद करू लागले आहेत.
गेल्या वर्षभरात विविध समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने काढलेल्या मोर्चा नंतर या दलालांचा विशेष सुळसुळाट झाल्याचे निदर्शनास येते.मराठा क्रांती मोर्चे ठिकठिकाणी निघू लागल्यानंतर हे दलाल आणखी सक्रीय झाले.या दलालांच्या कृष्ण कृत्यांमुळे बहुजन समाजाचे मुख्य घटक असलेल्या मराठा आणि दलीत समाजात मतभेद वाढू लागले.एकमेकांच्या सुखदुखात धावून जाणारे एकमेकांचा गळा घोटण्यासाठी सरसावू लागले. गावपातळीवर सामाजिक वातावरण कलुषित झाले.
बहुतेक गांव जातीय बाँब म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर झळकू लागली.या दलालांनी भौतिक ,आर्थिक सुखासाठी सामाजीक ऐक्य महत्वाकांक्षेच्या सुळावर चढविण्यास सुरूवात केली आहे,कोण आहेत हे सुपारीखोर दलाल? पर्दापाश करणारी मरेथान मुलाखत सोमवारपासून...