बनावट पासपोर्ट प्रकरण : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चौघे दोषी
नवी दिल्ली, दि. 24 - बनावट पासपोर्ट प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने हा निर्णय दिला आहे. दोषी ठरवलेले इतर तिघे हे पासपोर्ट कार्यालयाचे निवृत्त अधिकारी आहेत. छोटा राजनसह चौघांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. 70 पैकी अधिक खटल्यात आरोपी असलेल्या छोटा राजनविरोधातील हे पहिलं प्रकरण असेल, ज्यावर कोर्ट त्याला शिक्षा सुनावणार आहे.
बनावट पासपोर्ट प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाने चौघांविरोधात भारतीय दंडविधान कलम 420, 468, 471, 120बी, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. सीबीआयने पहिलं आरोपपत्र फेब्रुवारी 2016 मध्ये कोर्टात दाखल केलं होतं. यामध्ये छोटा राजनसह बंगळुरुच्या तीन निवृत्त अधिकार्यांच्याही नावाचा उल्लेख केला होता. सीबीआयनुसार, आरोपपत्रात चारही आरोपींचा फसवणूक, षडयंत्र रचणं आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत उल्लेख केला आहे.
सप्टेंबर 2003 मध्ये मोहन कुमार नावावर बनलेल्या बनावट पासपोर्ट आणि टूरिस्ट व्हिसावर छोटा राजनने भारतातून ऑस्ट्रेलियात पळ काढला होता. यानंतर तिथे तो सुमारे 12 वर्ष राहिला. ऑक्टोबर 2015 मध्ये जेव्हा छोटा राजन ऑस्ट्रेलियाहून इंडोनेशियाला पोहोचला, तेव्हा इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली. इंडोनेशियन पोलिसांनी त्याला बालीमध्ये अटक केली. त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये त्याला भारताकडे सोपवलं.