Breaking News

आता गायींनाही आधार नंबर?

नवी दिल्ली, दि. 24 -  गोरक्षावरुन देशभरात वाद सुरु असतानाच, केंद्र सरकारने पशू सुरक्षेबाबत सुप्रीम कोर्टात नवी माहिती दिली. भारत - बांगलादेश सीमेवर गाय संरक्षण आणि पशू तस्करी रोखण्याबाबत सरकारने सुप्रीम कोर्टात आपला अहवाल सोपवला. केंद्र सरकार आता गायींच्या सुरक्षेसाठीही आधारकार्डसारखी योजना आणू इच्छित आहे.  यूआयडीसारख्या यंत्रणेद्वारे गायींचं निश्‍चित स्थान कळेल, त्यामुळे ट्रॅक करणं सहज शक्य होईल, अशी माहिती सरकारने सुप्रीम कोर्टात दिली.
यामुळे गायीची संपूर्ण माहिती जसं की रंग, वय, वाण वगैरे माहितीवर लक्ष ठेवता येईल. महत्त्वाचं म्हणजे पशू सुरक्षेबाबत आधारसाठीच्या योजनेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अध्यक्षतेखालील समितीने आपली शिफारस सरकारकडे केली आहे. भारत-बांगलादेश सीमेवर मोठ्या प्रमाणात पशू तस्करी होते. त्यामुळे पशूंच्या सुरक्षेसाठी सहसचिव आणि गृहमंत्रालयाच्या नेतृत्त्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने अनेक शिफारशी केल्या आहेत.