Breaking News

रक्षाताई खडसे यांच्या हस्ते जलसेवा केंद्राचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 09 - महेश अर्बन पतसंस्थेने गत 20 वर्षापासून उन्हाळ्यात लोकांना ठंड पाण्याची सोय उपलब्ध केली आहे. त्या परंपरेला अनुसरुन यंदाही मााहेश्‍वरी समाज तसेच महेश्‍वरी महिला मंडळाच्या संयुक्त उपक्रमाने उन्हाळ्यात तहानलेल्या लोकांकरीता शुध्द फिल्टर केलेले थंड पाणी असलेली पाणपोई रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर महेश भवन समोर सुरू केली.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे, जि.प.अध्यक्षा सौ.उमाताई तायडे, आमदार चैनसुख संचेती आदिंची उपस्थिती होती. आगंतुकांनी रितसर संस्थेचे अध्यक्ष मख्खनलाला मुंधडा सह भगवान महेशची पुजा करुन तेथे उपस्थित जनसमुदायास पाणी वाटप केले. कार्यक्रमासाठी महेश अर्बन उपाध्यक्ष किशोर बाहेती संचालक नंदलाल राठी, चंद्रकांत भडगांवकर, पारसमलजी झाबक, मनिष लखानी, व्यवस्थापक सुनिल अग्रवाल व कर्मचारी वृंद तसेच महिला मंडळाच्या वतीने डॉ.सौ.कमल काबरा व सदस्य भगिनी तसेच माहेश्‍वरी युवक मंडळ व नवयुवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.