Breaking News

संभाजीराजांचे चरित्र सर्वांना समजण्यासाठी संभाजीराजे महानाट्याची निर्मिती : महाडीक

कराड, दि. 29 (प्रतिनिधी) : शिवपुत्र श्री. छ. संभाजी महाराज लढवये होते. त्यांनी कधी हार मानली नाही त्यांच्या बाबत समाजात अनेक समज गैरसमज आहेत. त्यातील गैरसमज नाहीसे होण्यासाठी आम्ही संंभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्याची निर्मिती केली आहे. कराड येथे होणार्‍या महानाट्याचा 100 वा यशस्वी प्रयोग सादर करीत आहोत. अशी माहीती संभाजी महाराज महानाटयाचे लेखक व दिग्दर्शक वसंतराव महाडीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी स्वराज ग्रूपचे गौतम करपे, उमेश शिंदे, बापु करपे, निरंजन साळुंखे, विजय पवार, गुंदेशा, गणेश लोहार, संजय लोंढे, रणजीत शेंवाळे उपस्थित होते.
महाडीक म्हणाले, श्री. छ. शिवाजी महाराजांनी शंभुराजांना स्वातंत्र्य दिले. संभाजी महाराजांनी अल्पवयातच अनेक स्वार्‍या केल्या. तसेच  आलेल्या संकटांना ते सामोरे गेले त्यांनी त्या-त्या वेळच्या लढाया जिंकल्या त्यांना हार ही माहीतच नव्हती महाराजांना इतिहास काळातही अनेक भाषांचे  ज्ञान होते. त्यांचा सर्वच विषयावर गाढा अभ्यास होता. संभाजी महाराज सुस्वभावी, चारित्र्य संपन्न, विश्‍वासु, लढवये असे राजे होते. परंतु त्यांच्या विषयी अनेक समज गैरसमज आहेत. त्यासाठी मी स्वत: संभाजी महाराजांच्या जीवनाचे रहस्य जाणुन घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास केला त्यानंतरच त्यांच्या जीवनावर महानाट्याची निर्मिती करून संभाजी महाराज समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कराड येथे आम्ही सादर करीत असलेल्या संभाजी महाराज या महानाट्याचा 100 वा प्रयोग आहे. येथील संयोजकांनी या महानाट्याचे संयोजन नीटनेटके केले आहे. या सादर होणार्‍या प्रत्येक प्रयोगात वेगळेपण असणार आहे.