Breaking News

कृष्णा कारखान्याचे दोन कर्मचारी ताब्यात

कराड, दि. 29 (प्रतिनिधी) : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी सात माजी संचालकांसह माजी कार्यकारी संचालक अटकेत असताना, कराड शहर पोलिसांनी कारखान्याचे दोन कर्मचारी ताब्यात घेतले. या प्रकरणात आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्यांची संख्या अकरा झाली आहे. 
ऊसतोडणी-वाहतूक कंत्राटदारांच्या नावावर बनावट स्वाक्षर्‍या करून बोगस कर्ज काढल्याप्रकरणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सांगली जिल्ह्यातील तीन तर सातारा जिल्ह्यातील चार माजी संचालकांना अटक केली होती. तर यापूर्वी माजी चेअरमन अविनाश मोहिते, माजी व्हाईस चेअरमन सुरेश पाटील यांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी कारखान्यातील दोन कर्मचारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बोगस कर्ज प्रकरणामध्ये यांचा सहभाग असून नेमकी यात त्यांची भूमिका काय याची चौकशी पोलीस करत आहेत. बोगस कर्ज प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या अकरा झाली असून आणखी काही जणांकडे चौकशी सुरू आहे. लवकरच अशा संशयितांना पोलीस ताब्यात घेतील.