Breaking News

चर्मकार समाजावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निवेदन सादर

अहमदनगर, दि. 07 - चर्मकार समाजावर होणार्‍या अन्याय अत्याचार्‍यांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असुन पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष  द्यावे अशी मागणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनावर अध्यक्ष राजेंद्र बुंदेले, शिवाजी साळवे, दिलिप कानडे, कैलास गांगर्डे, गणेश हनवते, संजय पोटे, सुभाष भागवत आदिंच्या सह्या आहेत.
निवेदना म्हंटले आहे की, समाजातील अल्पवयीन मुलावर शेवगांव पोलिस ठाण्यात अधिकारी व कर्मचार्‍यांनी मारहाण केली. यांच्यावर अस्ट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघााच्या वतीने करण्यात आली.