Breaking News

मानवाने संतांच्या विचारांचे अनुकरण केल्यास, जीवन समाधानी जगू शकतो

अहमदनगर, दि. 07 - तंत्रज्ञानाच्या  युगात मानव व नवीन पिढी सुफी संतांचे उर्स वगैरे तर संपन्न करत आहे, पण त्यांनी दिलेली शिकवणीला विसरत चालले आहे. जुन्या पद्धती, त्या काळातील रिती रिवाज आजच्या पिढीला तंत्रज्ञानापुढे कमी वाटत आहे, पण तसे नाही आहे. आजही त्या काळातील सुफी संतांनी केलेले कार्य हे मानवासाठी प्रेरणादायी आहे. त्याचे मानवाने अनुकरण केल्यास तो यशस्वी व समाधानी जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शाह फैसल (शानूभाई) यांनी केले.
अजमेरचे जगप्रसिद्ध सुफीसंत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचया 805 व्या उर्स निमित्त जुलूसे गरीब नवाज कमिटीतर्फे तख्ती दरवाजा येथून सालाबाद प्रमाणे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीच्या प्रारंभप्रसंगी शाह फैसल बोलत होते. यावेळी हाजी शहाबुद्दीन, नईम सरदार, इंजि.ईमरान खान, हाजी अन्वर खान, सैय्यद शरीफ, शेख अन्सार, सय्यद खलील, हनिफ जरीवाला, अ‍ॅकड.फारुक, मोसिन शेख, इरफान मामू, शेख यामीन, अनजर खान आदि मान्यवर उपस्थित होते. मिरवणुक संध्याकाळी पाच वाजता सुरु होऊन शहरातील नियमित मुख्य रस्त्यांनी होऊन परत तख्ती दरवाजा येथे आली असता सर्वांसाठी भंडारा व प्रसादाचे वाटप करण्यात आले. पुढे बोलतांना शाह फैसल म्हणाले की, ख्वाजा मोहेनुद्दीन चिश्तीच्या उर्सानिमित्त सर्व धर्मिय व जगातील त्यांचे अनुयायी अजमेरला लाखो करोडोच्या संख्येने हजेरी लावतात. हे त्यांच्या विचाराचाच प्रसार आहे की, त्यांनी मानव जातीसाठी मोठे कार्य केले आहे.