संस्कार हाच शिक्षणाचा मुळ गाभा - गांधी
अहमदनगर, दि. 07 - शिक्षणाचे माध्यम बदलले तरी संस्काराची पद्धत व जगण्यातील भाव बदलत नाहीत संस्कार हाच शिक्षणाचा मुळ गाभा असुन विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना पालकामधील शिक्षक दिसायला हवा असे प्रतिपादन श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी यांनी केले.
श्री तिलोक इंग्लीश मिडीयम स्कूलच्या वार्षिक पारितोषीक वितरण समारंभा प्रसंगी ते बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणुन सतीष गुगळे , घेवरचंद भंडारी, संपतलाल गांधी ,राजेंद्र मुथा, प्राचार्य अनिल बंडीवार आदिव्यासपीठावर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थीतांची मने जिंकली.
गांधी म्हणाले, मुलापेक्षा पालकच सोशल मिडीयाच्या जास्त आहारी जात असुन बालक- पालक संवाद संपत चालल्याने घरातील मुले स्वतःला असुरक्षित समजु लागली आहेत. मुलांना खेळण्याचा आग्रह होत नाही त्यांच्या सकस आहाराकडे लक्ष देण्या ऐवजी हॉटेलिंगची सवय बाल पणापासुन लावली जाते . व्यक्तीमत्व विकासाच्या महत्वाऐवजी मुलांना कंटाळा येईल असा सहवास पालकांकडून मिळतो . मुलांच्या मानसिक पातळीवर येउन त्यांचेशी साधलेला संवाद विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरतो शाळेमध्ये किमान दोन वेळा सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन झाले पाहिजे कलागुणांना वाव मिळाला की विद्यार्थी संवाद साधण्यास उत्सूक होउन सर्वत्र सहभाग नोंदवतात व्यसने नकारत्मक भावने पासुन दूर राहतात . कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्राचार्य अनिल बंडीवार , सुत्रसंचालन अपर्णा वेलदे तर आभार स्वाती शेटे यांनी मानले.