Breaking News

आता नववीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांचीही फेरपरीक्षा

मुंबई, दि. 28 - नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नववीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. दहावीप्रमाणे नववीतील विद्यार्थ्यांनाही पुन्हा संधी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती कमी करणे, हा या निर्णयामागे उद्देश आहे.
नववीत एखादा विद्यार्थी अऩुत्तीण होत असेल तर त्याला फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2017-2018 पासून नववीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. नववीत एखादा विद्यार्थी नापास झाल्यास त्याला त्याचवर्षी जूनमध्ये फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची एक संधी दिली जाणार आहे. दहावीप्रमाणेच नववीतील विद्यार्थ्यांनाही पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.