Breaking News

अंत्री देशमुख येथे गोठ्याला आग

बुलडाणा, दि. 23 - येथील कैलास दामोधर खरात यांच्या गोठ्याला दि. 21 एप्रिल 2017 रोजी शुक्रवारला दुपारी 11.15 वाजता आग लागली. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले. ग्रामस्थानी आग विझवण्याचा अटोकाट प्रयत्न केल्यामुळे सुमारे एका तासात आग नियंत्रणात आली. त्यानंतर नगर परिषद मेहकरची अग्निशमन यंत्रणेची गाडी आली आणि उरवरीत आग विझविण्यात आली. हवेचा वेग खुप जास्त असल्यामुळे 500 फुट अंतरावरील दिलीपराव भिमराव देशमुख यांच्या शेतातील जनावरांसाठी ठेवलेले कुटार जळुन खाक झाले आगीमध्ये कैलास दामोधर देशमुख यांचा औत-अवजारे, लाकडी दरवाजा, खिडक्या, कांदा आणि कुटार इत्यादी जळाल्यामुळे त्यांचे अंदाजे 40,000/ (चाळीस हजार रूपयाचे) नुकसान झाले. तर दिलीपराव भिमराव देशमुख यांचे 16,000/ (सोळा हजार रूपयाचे) नुकसान झाले. आगीचे नेमके कारण कळु शकले नाही. पण आगग्रस्तांना मदतीची मागणी केली जात आहे. आगग्रस्तांना भेट देण्यासाठी मंडख अधिकारी चनखोरे व पटवारी गारोळे हे दोघेही आले होते.