Breaking News

बसची वाट पाहत थांबलेल्या वर्‍हाडास भरधाव कारची धडक; दोन महिला ठार तर 5 जण गंभीर

बुलडाणा, दि. 23 - मलकापुर बस थांब्यावर बसची वाट पाहत थांबलेल्या वर्‍हाडी व गावातील मंडळींना नांदुर्‍यावरून मलकापुरकडे येत असलेल्या एका भरधाव वेगातील कारने जबर धडक देवुन सदर वाहन चालक वाहन घेवुन पसार झाला. तर या धडकेत दोन महिला ठार होवुन 5 जण गंभिर जखमी झाल्याची घटना 21 एप्रिल रोजी धनोरा (विटाळी) बस थांब्यावर दुपरी 4 वाजेच्या सुमारास घडली.
धनोरा येथील लोणकर परिवारातील लग्न सोहळा आटोपुन वर्‍हाडी व गावातील मंडळी परतीच्या मार्गावर धनोरा (विटाळी) बस थांब्यावर बसची वाट पाहत असतांना नांदुर्‍यावरून मलकापुरकडे जाणार्‍या एम.एच.28 ए.एन.3017 यसा भरघाव वेगातील कारने राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर 8 ते 10 फुट रस्ता सोडत बस थांब्यावरील 7 जणांना जबर धडक दिली. या धडकेत रत्नाबाई एकनाथ भोलवणकर (वय 50) रा.हनुमान नगर मलकापुर, देवकाबाई प्रल्हाद भोलवणकर (वय 60) रा.शिरसोडी या दोन महिला अपघातात ठार झाल्या.
तर एकनाथ भेलवणकर (वय 55) रा.हनुमान नगर मलकापुर, परमेश्‍वर लहुजी ठाकरे (वय 50) रा.धनोरा, उज्वला शत्रुघ्न थेरोकार (वय 30) रा.लांजुळ, विश्‍वनाथ क्षिरसागर (वय 38) रा.विटाळी, मधुकर भगत (वय 46) रा.धनोरा आदी पाच जण  गंभीररित्या जखमी झाले आहे. दरम्यान ही बाब परिसरात क्षर्णात वार्‍यासारखी पसरली. अपघाताची घटना कळताच पत्रकार संदिप गावंडे यांनी जखमींना येथीलच विजय घोगे यांच्या वाहनातुन  तातडीने मलकापुरला डॉ.राहुल चोपडे यांच्या खासगी रूग्णालयात उपचारार्थ भरती केले.
रूग्णलयात डॉक्टरांनी तपासणी केली असता रत्नाबाई एकनाथ भोलवणकर व देवकाबाई प्रल्हाद भोलवणकर यांना मृत घोषित केले. तर सध्य स्थितीत उर्वरीत जखमींवर उपचार सुरू आहेत. ही घटना कळताच ग्रामीण पो.स्टे.चे पोनि.मधुकर भोगे रूग्णालयात दाखल होत प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या क्रमांकावरून सदर वाहनाचे शोध घेण्याचे कार्य पोलिसांनी हाती घेतले आहे.  या दुर्देवी अपघातामुळे अपघातामुळे भोलवणकर परिवारासह परिसरात शोककळा पसरली आहे.