Breaking News

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश वाटप

बुलडाणा, दि. 29 - तालुक्यातील सरंबा येथील शेतकरी गणेश सखाराम ताठे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून 26 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती सदर शेतकर्याच्या कुटूंबास तहसीलदार दीपक बाजड यांच्याहस्ते शासकीय मदतीचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला.
गणेश सखाराम ताठे या कर्जबाजारी शेतकर्याने आपली जीवनयात्रा संपविल्याने सदर कुटुंब उघड्यावर आले होते. दरम्यान या कुटुंबाला आधार देण्यासाठी एक लाख रूपयाची मदत शासनाकडून मंजूर करण्यात आली.. सदर मदतीचा धनादेश तहसिलदार दिपक बाजड यांच्या हस्ते मयत शेतकर्यांची पत्नी वंदना गणेश ताठे यांना 27 एप्रिल रोजी देण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी संजय टाके, तलाठी विनोद सांगळे, संदीप चेके, शिवाजी चेके, रोजगार सेवक पंढरीनाथ गिते व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.