पाटबंधारे विभाग सर्व शेतकर्यांना शेतीसाठी पाणी देणार -आशुतोष काळे
कोपरगाव, दि. 30 - पाण्याचा अपव्यय होत असल्याच्या गोंडस नावाखाली पाटबंधारे विभाग काही दिवसांनी सुरु होणा-या गोदावरी कालव्याच्या डाव्या व उजव्या लाभक्षेत्राला उन्हाळी आवर्तनाचा लाभ कालव्याच्या वितरीकेपासून अर्ध्या अंतरावर असणा-या पिकांनाच देण्याचा सुलतानी निर्णय घेवून अर्ध्या अंतरापेक्षा जास्त असलेल्या शेतक-यांचे पाणी मागणी अर्ज स्वीकारीत नव्हते. या शेतक-यानी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांच्याकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी वितरीकेपासून अर्ध्या अंतरापेक्षा जास्त असणा-या शेतक-यांचे पाणी मागणी अर्ज स्वीकारत नाहीत याबाबत शेतक-यांनी आपल्या व्यथा मांडल्या होत्या. शेतक-यांवर होत असलेला अन्याय पाहून युवा नेते आशुतोष काळे यांनी तातडीने पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता शिंदे यांना समक्ष भेटून निवेदन दिले.
निवेदनात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात यावर्षी चांगल्या प्रकारचा पाऊस झाल्याने धरण क्षेत्रात पाण्याचा मुबलक साठा झाला होता. त्या अनुषंगाने पाटबंधारे खात्याने शेतीसाठी आवर्तने देण्याचे जाहीर केलेले होते. शेतीचे आवर्तन वेळेवर व पूर्ण क्षमतेने मिळणार या आशेवर गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतक-यानी मोठ्या प्रमाणात फळबागा, गहू, हरबरा, ऊस व चारा पिके उभी केली होती. गहू, हरबरा या पिकांचा हंगाम संपला असला तरी सध्या फळबागा, ऊस व चारा पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.ऐन उन्हाळ्यात मोठा खर्च करून ऊस, फळबागा व चारा पिके उभी केली आहे ती पिकं जर पाण्या अभावी जळून गेली शेतकरी उध्वस्त होणार आहेव जनावरांच्या चा-याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यापूर्वी गोदावरी कालव्यांवर बारमाही ब्लॉक ची संकल्पना होती. या बारमाही ब्लॉक पायी लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या जास्तीच्या जमिनी शासनाने काढून घेतल्या आहेत. आणि आता तर बारमाही संकल्पना मोडीत काढून खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामाची स्वतंत्र नमुना नंबर सात वर सिंचनासाठी पाणी देण्याचे धोरण अवलंबिले. आता त्यातही बदल करून नवीन नियम तयार केला की, पाण्याचा अपव्यय होत असल्याने वितरिकेच्या अर्ध्या अंतरापर्यंत असणा-या पिकांनाच पाणी मिळेल. हा निर्णय वितरिकेच्या अर्ध्या अंतरापेक्षा जास्त शेती असणा-या शेतक-यांवर अन्याय करणारा आहे. आपल्या पाटबंधारे विभागाच्या भरवशावर शेतक-यांनी आपल्या शेतात पिके उभी केली आहेत. जर या पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर ही सर्व पिके जळून जाणार आहेत व शेतक-यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल.
या सर्व बाबींचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारत्मक विचार करून जे शेतकरी सात नंबर पाणी मागणी आर्ज करतील अशा सर्वच शेतक-यांना शेतीसाठी पाणी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सर्वच शेतक-यांचे पाणी मागणी अर्ज स्वीकारले जाणार असून ज्या शेतक-यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज भरले नाहीत त्या शेतक-यांनी आपले अर्ज संबधित कार्यालयाकडे तातडीने जमा करून त्याची रीतसर पोहोच घ्यावी पाणी मागणी अर्ज भरणा-या सर्वच शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळणार असल्याची माहीती आशुतोष काळे यानी दिली आहे.