Breaking News

प्रामाणिकपणे सेवा करणार्‍यांचाच गौरव होतो - शेटे




जलसंपदाचे कर्मचारी दत्तात्रय काळेंचा सेवापुर्ती गौरव

। अकोले/प्रतिनिधी । 30 - ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी निस्वार्थी भावनेने काम केले तर नक्कीच त्या भागातील जनता व अधिकारी त्या कर्मचार्‍याच्या कामावर खुष असते. सरकारी सेवेत काम करीत असताना आपण ज्या ठिकाणी काम करतो, त्या विभागात प्रत्येक कर्मचार्‍याने तन, मन, धन याप्रमाणे काम केले तर सेवा पुर्ती सोहळा करण्यासाठी त्या विभागातील अधिकारी व जनता नक्कीच अग्रेसर असते, असे मत संगमनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते मच्छिंद्रनाथ शेटे यांनी चिंचोली (काळे वस्तीवर) दत्तात्रय दामोधर काळे जलसंपदा विभागाचे सेवा निवृत्त अधिकारी यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळयात ते बोलत होते. यावेळी काळे कुटुंबियांच्या वतीने सौ. अलका काळे व दत्तात्रय काळे व त्यांचे पुत्र सतिष काळे, विकास काळे, स्नुषा निर्मला काळे, मनिषा काळे यांचा सत्कार करण्यात आला.
दत्तात्रय काळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, जीवनात काम करीत असताना आई वडीलांनी दिलेली शिकवणूक उराशी बाळगून मी 1980 साली जलसंपदा विभागात रुजू झालो. माझ्या सेवेला चितळवेढे वसाहतीत सेवा करीत असताना वारकरी सांप्रदायाची जोड असल्यामुळे काम हे माझे सर्वश्रेष्ट मानत अधिकारी व कर्मचारी यांच्या साथीला साथ देत मी सेवेत या समाजाचा एक सेवक म्हणून काम केले. काम करत असताना चुका झाल्या असल्या तरी माझ्या वरीष्ठांनी मला सहकार्य केले. मनात पैसा कमविणे हे ध्येय नव्हते मात्र सरकारी सेवेत मला नोकरी मिळाल्याचा जास्त आनंद झाला. हा आनंद 38 वर्षाच्या काळात माझ्या सर्व कुटुंबियांना मोठा होता. आयुष्यभर पत्नी सौ. अलका काळे हिने मला मोठी साथ दिली. जीवनात पैसा कमविला नसला तरी परमेश्‍वराने दिलेली गोड मानसे कमविण्यात माझ्या काळे कुटुंबियांचा मोठा वाटा राहिला. यापुढील काळात झालेली सेवा व भविष्यकाळात वारकरी सांप्रदायास वेळ देण्यासाठी मी पुढे राहिल. आज माझा जो कुटुंबीय, नातेवाईक, पंचक्रोशीच्या वतीने सत्कार झाला हा माझ्या जीवनातील अतीआनंद झाला. सेवा निवृत्त होताना देखील माझ्या शेजारील आश्‍वी गावातच झाली, याचा आनंद द्विगुणीत आहे. यावेळी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवीचंद तांबे, अ‍ॅड. बाबासाहेब तांबे, दिपक भोसले, प्रकाश गिते, रंगनाथ थेटे, दिपक थेटे, चांगदेव थेटे, प्रकाश मामा थेटे, बाळासाहेब तांबे, प्रकाश तांबे, दादापाटील अनारखे, भारत (आबा) काळे, भाऊसाहेब काळे, सौ. कमल काळे, सुनिता काळे, बाळासाहेब काळे यासह अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.