Breaking News

पंढरीच्या आषाढी वारीचा सोहळा जाहीर

पिंपरी चिंचवड, दि. 25 - पंढरीच्या आषाढी वारीचा सोहळा जाहीर झाला आहे. तुकोबांच्या पालखीचं 16 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे, तर 17 जूनला माऊलींची पालखी निघणार आहे.
अखंड महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ज्या क्षणाची ते आतुरतेनं वाट पाहत असतं, त्या आषाढी वारीचा धार्मिक सोहळा जाहीर झाला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच 16 जूनला, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीच 17 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. शेतकरी वर्ग खासकरून याची या सोहळ्याची वाट पहात असतो. मात्र, गेली काही वर्षे दुष्काळाची झळ महाराष्ट्राला बसल्यानं अनेक शेतकर्‍यांनी याकडं पाठ फिरवली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून वारकरी पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी होतात. विठू-रखुमाईच्या नामाचा गजरात तल्लीन होतात. त्यामुळे आषाढी वारीची ओढ संपूर्ण वारकरी सांप्रदयाला लागली आहे.