रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन बसवणार!, संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प
रायगड, दि. 25 - किल्ले रायगडावरील राजदरबारात 32 मण सोन्याचं सिंहासन बसविण्याचा संकल्प येत्या 4 जून रोजी करणार, असल्याची घोषणा श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांनी केली. रायगड जिल्ह्यातील महाड येथील कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महाड येथील विरेश्वर मंदिर येथे संभाजी भिडे गुरुजी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं . यावेळी रायगड जिल्ह्यातून चार ते पाच तालुक्यातून धारकरी उपस्थित होते. यावेळेस बोलताना संभाजी भिडे गुरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जीवनमानाचे वर्णन केले. तसेच राजदरबारात 32 मण सोन्याचं सिंहासन पुनर्स्थापित करण्यास असल्याचं यावेळी सांगितलं. भिडे गुरुजी म्हणाले की, येत्या 4 जून रोजी किल्ले रायगडावर नवा संकल्प करण्यात येणार आहे. यामध्ये 32 मण सोन्याच्या सिंहसनाची पुनर्स्थापना करायची आहे. हा संकल्प कुणा एका व्यक्तीचा नसून, हिंदवी स्वराज्याचं सिंहासन पुनर्स्थापित करण्याचा संकल्प आहे.’’