Breaking News

अनुदान मिळण्यासाठी आधार लिंक आवश्यकच - विजयकुमार इंगळे

अहमदनगर, दि. 30 - जितके पीककर्ज घेतले आहे, निदान तितके तरी उत्पादन त्या शेतकर्‍याला मिळायला हवे. कारण नुकसानीतला व्यवसाय करण्याचे दिवस आता राहिलेले नाही. शेतकर्‍यांची उत्पादकता वाढविणे हे ’उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियानाचे उद्दिष्ट आहे. शेतकर्‍यांना आता अनुदान घ्यायचे असेल, अथवा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी आधार लिंक आवश्यकच आहे, असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी केले.
कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ’उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियान कार्यशाळेप्रसंगी क्षी. इंगळे बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. किरण कोकाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, प्रकल्प संचालक (आत्मा) भाऊसाहेब बर्‍हाटे, डॉ. शरद गडाख, डॉ. मधुकर धोंडे, डॉ. अशोक मुसमाडे, डॉ. आनंद सोळंकी, आर. के. गायकवाड यांच्यासह मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक, शास्त्रज्ञ आदी उपस्थित होते.