Breaking News

खडकवासला व चासकमान प्रकल्पाच्या आवर्तनसाठी राज्य राखीव पोलीस दलाची मदत घेणार - पालकमंत्री

पुणे, दि. 17 - चासकमान प्रकल्पाचे सिंचन आवर्तन सुरु करण्यात आलेले आहे. उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे कालवा फोडून पाणी घेणे ,अनधिकृत पंप लावून उपसा करणे यासारख्या कृत्यांमुळे कायदा व सुव्यवस्था परिस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे.या परिस्थितीत  सर्व संबंधित खात्यांचा समन्वय असणे आवश्यक आहे, खडकवासला व चासकमान प्रकल्पाच्या आवर्तनसाठी राज्य राखीव पोलीस दलाची मदत  घेण्यात येईल,असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. 
व्ही.व्ही.आय.पी. विश्रामगृह,पुणे येथे आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा,महसूल,पोलीस,महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. त्यानुसार अनधिकृत पथके तैनात करणे,अहोरात्र गस्त घालणे व  याविषयीची चर्चा झाली. अनधिकृत पाणी उपसा करणार्‍यांवर तसेच गेट तोडणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश श्री.बापट यांनी दिले. पुणे ग्रामीण पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने व लोकांचा उद्रेक वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य राखीव पोलीस दल यांची मदत घेण्याचे निर्देश यावेळी दिले.
उपलब्ध पाण्याची मर्यादा लक्षात घेता सगळ्यांनी पाणी काटकसरीने वापरावे,नियोजनाप्रमाणे  पाणी घेतले तर सगळयांना पुरेसे पाणी मिळू शकते. त्यासाठी शेतकर्‍यांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे ,असे आवाहन श्री. बापट यांनी केले . या बैठकीस जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, महावितरण पुणे ग्रामीणचे मुख्य अभियंता ईरवाडकर, महावितरण पुणे ग्रामीणचे मुख्य अभियंता ईरवाडकर,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती तानाजी चिखले, उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्रकार,खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गौतम लोंढे आदी उपस्थित होते.