Breaking News

महापुरुषांना जाती,धर्माच्या चौकटीत बांधून ठेवण्याचे प्रयत्न उधळून लावा : अ‍ॅड.रोठे

बुलडाणा, दि. 17 - महापुरुषांना जाती धर्माच्या चौकटीत बांधून ठेवनयाचे मनसूबे स्वार्थी प्रवृत्तीच्या तथाकथीत धर्मांध व राजकीय नेत्यांनी सुरू केले असून असे स्वार्थी मनसूबे उधळून लावण्यासाठी व प्रतिबंध घालण्यासाठी महापुरुषांची सर्वसमावेषक तत्वप्रणाली वृध्दींगत करणे काळाची गरज आहे. असे प्रखर मत अ‍ॅड.सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केले.
स्थानिक आझाद हिंद संघटनेच्या वतीने 5 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान महामानव विचार शृंखलेचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे अचैत्य साधून आयोजित महामानव विचार शृंखलेचा समारोप 14 एप्रिलला सांयकाळी संघटनेच्या संपर्क कार्यालयात करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अ‍ॅड. सतीशचंद्र रोठेंनी उपरोक्त विचारांची आदरांजली समर्पीत केली.
सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला रितसर सुरवात करण्यात आली.  प्रमुख उपस्थितीमध्ये दलित आदिवासी मुक्ती मोर्चाचे संस्थापक प्रशांत सोनोने, आझाद हिंद संघटनेचे अ‍ॅड.रोठे, अक्षय तायडे, रवी भोंडे, सोपान बिचारे, सुरेखा निकाळजे, रंजना सपकाळ, शिला इंगळे यांच्यासह सामाजिक श्रेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सात दिवसीय महामानव विचार शृंखला कार्यक्रमात दैनंदिन दुपारी 12. 00 ते 5.00 दरम्यान विविध मान्यवरांनी भेटी देत साहित्य उपलब्ध करून दिले व  संघटनेच्या उपक्रमाचे कौतूक केले. महामानवांचे साहित्य वाचन, चिंतन आणि मनन अशा पाच तासांच्या कार्यक्रमात सात दिवसांत 35तास नामवंत लेखकांचे साहित्य वाचन आयोजन आझाद हिंद संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.
सदर उपक्रमात आझाद हिंदचे सर्वश्री पदाधिकारी योगेश कोकाटे, सागर अवचार, अजय टप, श्रीकृष्ण भगत, राहूल गोसावी, इमरान शेख, नलीनी उन्हाळे, गणेश झामरे, प्रमीला सशीर, समाधान इंगळे, समा धनवे,आदेश कांडेलकर, सद्दाम नवाब, प्रीतम मेढे, भागवत व्यवहारे, ममता कोथळकर, सुलभा खरात, रंजना मोरे, सुनीताताई मोकळे, पंचफूला गवई, अलका खांडवे यांच्यासह बुलडाणा शहरातील  विद्यार्थी-विद्यार्थिनी  स्वंयस्फूर्तीने सहभाग नोंदवीत महापूरूषांना विचार परिवर्तनाचे कृतीप्रवन अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.