Breaking News

महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

बुलडाणा, दि. 17 -  राज्य शासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराकरीता  सन 2017-18 करीता व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणार्‍या कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज 25 एप्रिल 2017 पर्यंत अर्ज सादर करावे.
मागविण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी इच्छूक व्यक्ती किंवा संस्थांनी 25 एप्रिल 2017 पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. प बुलडाणा येथे सादर करावेत. या पुरस्कारासाठीचे अर्ज जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जि. प बुलडाणा येथे उपलब्ध आहेत.
व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांच्या पुरस्कारामध्ये  लेखक, कवि, पत्रकार/संपादक  व साहित्यिक प्रत्येकी एक याप्रमाणे पाच पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते गटात दहा पुरस्कार, किर्तनकार, प्रवचनकार गटात 4 पुरस्कार, पारंपारिक लोक कलावंत गटात सहा पुरस्कार, शासकीय अधिकारी/कर्मचारी, निमशासकीय अधिकारी/कर्मचारी गटात तीन पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच सामाजिक सेवाभावी संस्थांसाठी सेवाभावी संस्था गटात तीन, युवक मंडळे, महिला, भजनी, बचत गट व क्रीडा मंडळांकरीता तीन पुरस्कार देण्यात येणार आहे.
शाळा व महाविद्यालयासाठी तीन पुरस्कार देण्यात येतील. माध्यमांकरिता वृत्तपत्र गटात हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेकरीता प्रत्येकी एक याप्रमाणे तीन पुरस्कार, इलेक्ट्रॉनिक माध्यम गटात दोन पुरस्कार देण्यात येणार आहे. उद्योग - कारखान्यांकरीता तीन पुरस्कार, उद्योग व्यवस्थापन तीन पुरस्कार, मजूर संघटनांकरिता तीन पुरस्कार अशाप्रकारे एकूण 51 पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराकरीता पात्रता : व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक व भरीव कार्य करणारी व्यक्ती, संस्था असावी, या पुरस्कारासाठी वयाची अट नाही, सदर व्यक्ती किंवा संस्था राज्यात कार्यरत असावी, जिल्हा, राज्य, तालुका पातळीवर कमीत कमी 15 वर्ष व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य केलेले असावे, कोणत्याही व्यक्तीस/संस्थेस एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही, पुरस्कारासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणारे लोकप्रतिनिधी पात्र असणार आहेत, संस्थेची नोंदणी  स्वयंसेवी संस्था नोंदणी अधिनियम 1950 व 1860 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे. संस्था किमान 15   वर्ष जुनी असावी, सदर संस्थेने व्यसनमुक्ती क्षेत्रात किमान 10 वर्षपेक्षा अधिक कार्य केलेले असावे, तसेच मागील पाच वर्षांचे लेखा परीक्षण अहवाल प्रस्तावास जोडणे आवश्यक आहे. या पुरस्कारासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज सहायक जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा येथे उपलब्ध आहे. प्रस्ताव तीन प्रतीत पासपोर्ट फोटो चिटकवून 25 एप्रिल 2017 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.