Breaking News

मुक्ताईनगरमध्ये खडसेंकडून विरोधकांचं स्वागत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

जळगाव, दि. 16 - शेतकरी कर्ज माफीसाठी निघलेली संघर्ष यात्रा आज भाजप नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे पोहचली. यावेळी खडसेंच्या फार्म हाऊसवर अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे यांनी खडसेंची भेट घेतली. पण ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं खडसेंनी सांगितलं.
संघर्ष यात्रेनिमित्त विरोधक फडणवीस सरकारला अडचणीत आणत असतान दुसरीकडे खडसें यांच्या घरी विरोधकांच्या भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. सध्या एकनाथ खडसे भाजपमध्ये एकाकी पडले असताना या भेटची बरीच चर्चा रंगली आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षाच्या दुसर्‍या टप्प्यातल्या संघर्ष यात्रेला बुलडाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथून सुरवात झाली. या संघर्ष यात्रेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.