Breaking News

हायवेलगत दारुबंदीवर तोडगा काढा, हॉटेल मालक संघटना आक्रमक

मुंबई, दि. 04 - हायवेलगतच्या दारुच्या दुकानांवर बंदी आणण्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राज्य सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. हॉटेल मालकांची संघटना असलेल्या ‘आहार’नं ही मागणी उचलून धरली आहे.
हायवेपासून 500 मीटर अंतरावर दारुविक्रीला बंदीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं लागू केला आहे. 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाल्यामुळं राज्यभरातले 10 हजार बार आणि परमिट रुम बंद आहेत. त्यामुळे 8 ते 9 लाख लोकांचा रोजगार बुडत असल्याचं आहार संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टींनी सांगितलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्याप्रमाणे शेजारच्या राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महामार्ग हस्तांतरित करुन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर तोडगा काढला, तसं पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उचलावं अशी विनंती आहार संघटनेनं केली आहे.