आळंदी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारकाची पाहणी
लोकसहभाग सामाजिक उपक्रम
। अकोले/प्रतिनिधी । 30 - आळंदी नगरपरिषद चौकातील रस्तारुंदीकरां बाधित छत्रपती शिवाजी महाराज अर्धपुतळा स्मारकाचे स्थलांतर होत असलेल्या व्यापारी संकुल क्रमांक 1 समोर लोकसहभागातून स्मारकाचे विकास कामाची पाहणी उपनगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे यांचे माध्यमातून करण्यात आली.या प्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश कुर्हाडे,सचिन गिलबिले, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर (कांबळे), स्मारक समितीचे प्रमुख आनंदराव मुंगसे, कामगार नेते अरुण घुंडरे, अमोल खैरे, मंडूबाबा पालवे, राजु तापकीर आदींसह नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी माजी नगरसेवक व पुतळा स्मारक समितीचे प्रमुख आनंदराव मुंगसे म्हणाले, आळंदी नगरपरिषदेच्या सहकार्याने व्यापारी संकुल समोर सुरु असलेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक आळंदीचे वैभवात वाढ करणारे आहे. लोकसहभागातून सामाजिक उपक्रम म्हणून पुतळा स्मारक विकसित करून आळंदी नागरपरिषदेकडे देखभाल दुरुस्ती आणि पुढील नियोजनासाठी काम पूर्ण झाल्यानंतर हस्तांतरण केले जाणार आहे. सुमारे 7 लाख रुपये खर्चाचे विक्स काम लोकसहभागातून होणार आहे.पुतळा स्मारक परिसर देखील विकसित करण्याचा मानस असून आळंदी नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेतला आहे. नागरिक, भाविक, देणगीदार व्यक्ती संस्था यांचे माध्यमातून लोकसहभाग गेट हे स्मारक विकसित केले जात आहे. यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था यांनी सहकार्य केल्यास लवकरच स्मारक विकसित होईल. स्मारकाचे कामाल गती देण्यात आली आहे.
आळंदी नगरपरिषद व्यापारी संकुल एक परिसरातील स्मारक हे आळंदीचे आणि व्यापारी संकुलाचे देखील वैभवात वाढ करणार आहे.नागरिकांची इच्छा काम लवकर पूर्ण होऊन लोकार्पण सोहळा लवकर व्हावा अशी आहे.स्मारक समितीने देखील शिवतेज मित्र मंडळाचे विशेष सहकार्य आणि हाती घेऊ ते तडीस नेऊ या उक्ती प्रमाणे स्मारकास गती दिल्याचे माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे यांनी सांगितले.
लोकसहभागातून सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अर्ध पुतळा स्मारकास आवशयक ते सहकार्य करण्यात येईल. कामात खंड पडू न देता कमी पूर्ण करण्यात येईल असे माजी नगरसेवक अशोक उमरगेकर (कांबळे) यांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषद चौकात शिवतेज मित्र मंडळाचे विशेष सहकार्याने छत्रपती शिवजी महाराज अर्ध पुतळा स्मारक विकसित करण्यात आले होत. मात्र आळंदी येथील मंजूर विकास आराखडा योजनेतील रस्तारुंदीकरण बाधित जागेत स्मारक बाधित होत असल्याने नगरपरिषद चौकातील स्मारक स्थलांतरित करून व्यापारी संकुल क्रमांक एक समोरील प्रशस्त जागेत नव्याने विकसित करण्यात येत आहे.यासाठी आळंदीकर नागरिक, व्यापारी आणि पदाधिकारी यांनी प्रतिसाद देत लोकसहभाग मिळविला आहे.
या कामासाठी सुमारे 16 हजार किलोवर मार्बल दगडाचा वापर करण्यात येत आहे.नागरिकांनी आपले योगदान सामाजिक उपक्रमात देण्याचे आवाहन नगरसेवक प्रकाश कुर्हाडे यांनी केले आहे.
