Breaking News

इंग्लंडचा युवा क्रिकेटपटू जाफर अन्सारीची क्रिकेटमधून निवृत्ती

लंडन, दि. 27 - इंग्लंडचा युवा क्रिकेटपटू जाफर अन्सारी याने वयाच्या 25 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. 2015मध्ये आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्याद्वारे अन्सारीने इंग्लंड क्रिकेट संघात पदार्पण केले होते. त्यानंतर लगेचच त्याने निवृत्तीची धोषणा केलीये. सरे काऊंटी क्रिकेट क्बलकडून अन्सारी खेळला. सात वर्षे व्यवसायिक क्रिकेटपटू आणि दोन दशके क्रिकेट खेळल्यानंतर मी निवृत्ती घेण्याचा विचार केलाय. हा कठीण निर्णय होता, असे अन्सारी म्हणाला.