कुकडीचे पाणी मिळत नसल्याने युवा शेतकर्याची आत्महत्या
अहमदनगर, दि. 30 - कुळधरण येथील युवा शेतकर्याने डोक्यावरील कर्जाचा डोंगर, शेतीमालाला नसलेला भाव व कुकडीचे पाणी मिळणार नसल्याने होणारे नुकसान याचा धसका घेत आज सकाळी आपल्या शेतातील लीबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील प्रकाश बाळासाहेब थोरात या 28 वर्षीय युवक शेतकर्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. कुळधरण मध्ये वडील दोन भाऊ व परिवारासह राहणार्या थोरात कुटुंबियांना 14 एकर शेती शेतीमध्ये सुधारणा करून कर्ज काढून शेततलाव तयार केला मोसंबीची बाग लावली नुकतीच डाळीबाची बाग लावली असून शेतात एक हजार बॅग कांदा असताना आज सकाळी 8 वाजता प्रकाश थोरात हा मोसंबी तोडण्यासाठी बागेत गेला यानंतर सकाळी 9 वाजता वडिलांनी त्यास जेवणासाठी हाक मारली असता त्याने प्रत्युत्तर दिले नाही त्यामुळे त्याचे वडील काम करत असलेल्या दिशेने गेले असता त्यांना लिंबाच्या झाडाला प्रकाश याने गळफास घेतल्याचे पाहिले व ते मोठ्याने ओरडले असता त्याची पत्नी धावत आली इतर लोक हि आले व त्यास खाली काढण्यात आले व कुळधरण येथील दवाखान्यात नेण्यात आले मात्र तो पर्यत उशीर झाला होता. 14 एकर क्षेत्रातील 6 एकर मोसंबी लावलेली असून सध्या मोसंबीला अत्यंत कमी भाव असल्याने व शेतात असलेल्या कांद्याला हि भाव कमी असल्याने तो निराश झाला असण्याची शक्यता वर्तवली जात असून शेतीसाठी या कुटुंबीयांनी सहकारी सोसायटी बँक याचे कडून कर्ज काढले असून कुटुंबातील प्रकाश हा मोठा होता एका वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले होते तर नुकतेच एका बहिणीचे लग्न केले होते घरात आई वडील एक लहान भाऊ व एक बहीण असून त्याची लग्ने व्हायची आहेत. अशा परिस्थितीत मोसंबिला, कांद्याला भाव नाहीत कुकडीचे सुटणारे पाणी पोलीस बंदोबस्तात फक्त पिण्यासाठी आहे शेतीला मिळणार नाही या चर्चेने आगामी काळात पाण्याविना काय करायचे व डोक्यावर असलेले मोठे कर्ज कसे फेडायचे या दुष्टचक्राबाबत त्याचे मनात विचार आले असण्याची शक्यता असल्याची माहिती माजी उपसरपंच सतीश कळसकर यांनी व्यक्त केली. कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले व कुळधरण येथे त्याचेवर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अकस्मात घटनेने कुळधरण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.