Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सातारा, दि. 15 (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या क्रांतीसूर्य या लोकराज्यच्या विशेष अंकाचे वितरण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक हरिश्‍चंद्र माझीरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, तहसीलदार विवेक जाधव, नेताजी कुंभारे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.