चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता
चंद्रपूर, दि. 21 - चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलं आहे. काँग्रेसनं माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली पण त्यांना फारसं यश मिळवता आलेलं नाही.
आतापर्यंत जाहीर झालेल्या कलांमध्ये 27 ठिकाणी भाजपला आघाडी मिळाली आहे. तर काँग्रेसला अवघ्या 9 जागांववर आघाडी मिळली आहे. एकूण 66 जागांपैकी 34 जागा मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे इथेही सत्ता राखण्यात भाजपला यश मिळतंय असं म्हणायला हरकत नाही.